जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल दि. २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. या निकालानुसार शेंदुर्णीत भाजपने विजयाची हॅट्रीक करत सलग तिसऱ्यांदा आपली एकहाती सत्ता स्थापन केली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपचे गोविंद अग्रवाल विजयी झाले आहे.