महागाव: शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार वानखडे यांच्याहस्ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश
महागाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी भाजपा नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम आमदार किसनराव वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व जिल्हाध्यक्ष आरती फुपाटे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी जगदीश नरवाडे, बळवंतराव नाईक, श्रीधर भवानकर, योगेश वाजपेयी, दीपक आडे, सुदाम खंदारे, तसेच भाजपा शहराध्यक्ष निलेश नरवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.