नागपूर शहर: हसनबाग परिसरात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक
14 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतील हसनबाग परिसरात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव शेख फहीम शेख अजिज असे सांगण्यात आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे आरोपीकडून एक पाचशे रुपये किमतीचा धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.