अमरावती: दिवाळीच्या पावन-परवावर दहा किलो गहू व पाच किलो साखर उपल्ब्ध करा, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सन दिवाळी या दिवाळी महोत्सवाला स्वस्त धान्य दुकानातून दिलेली ज्वारी म्हणजे गरिबांची केलेली चेष्टा थांबवावी व आपण ताबडतोब दिवाळीच्या पावन-परवावर दहा किलो गहू व पाच किलो साखर उपलब्धता करून देण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे चंदू खेडकर संपक प्रमुख अमरावती यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आज २९ ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी १ वाजता निवेदन सादर करण्यात आले आहे.