देऊळगाव राजा -दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची नगरपरिषद कार्यालय येथे प्रचंड गर्दी झाली राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांना एबी फॉर्म न दिल्यामुळे सर्वच उमेदवारांनी एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तीन वाजेच्या आत आतमध्ये असलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज घेतले