कराड: कराड शहर पोलीस ठाण्याची कारवाई; रसायनयुक्त बनावट देशी दारु बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, साडेअकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त
Karad, Satara | Sep 15, 2025 ओगलेवाडी दुरक्षेत्र हद्दीत सैदापूर येथे कराड शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत मानवी जीवितास अपायकारक रसायन मिश्रीत बनावट देशी दारु बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्या ताब्यातुन ११ लाख ३८ हजार ५५० रुपये किंमतीचे रसायन मिश्रीत बनावट देशी दारु बनवण्याचे साहित्यासह बनावट देशी दारु जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता पत्रकारांना याबाबत माहिती दिली.