मानगाव: इंदापूर येथे कशेणे ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश
Mangaon, Raigad | Oct 11, 2025 आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास इंदापूर येथे कशेणे ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रवादी विचारांवर विश्वास ठेवत, मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात मनःपूर्वक स्वागत केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. असे खासदार सुनील तटकरे म्हणाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना, ‘कशेणे गावातील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी विचारसरणीला नेहमीच पाठबळ दिले असून, अशा प्रकारच्या गावपातळीवरील पक्षप्रवेशामुळे पक्षसंघटन अधिक बळकट होत आहे. सर्वांनी आगामी काळात ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी परिवार अधिक सक्षम आणि संघटित करण्याचा संकल्प बाळगला पाहिजे.