अंबरनाथ: अंबरनाथ शहराची वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आले सिग्नल, आमदार किणीकरांच्या हस्ते उद्घाटन
अंबरनाथ शहराची वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम अंतर्गत अंबरनाथ शहरांमध्ये मटका चौक, फॉरेस्ट नाका व अंबरनाथ नगरपरिषद महात्मा गांधी शाळा येथिल चौक या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आलेले तसेच सदर कामाचे उद्घाटन आज गुरुवारी दुपारी २ च्या दरम्यान आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्याहस्ते मटका चौक या ठिकाणी करण्यात आले आहे. शहरात सिग्नल बसवल्याने वाहतूकस होणारा अडथळा दूर होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.