नागपूर शहर: अजनी परिसरात आढळलेल्या अनोळखी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू; पोलिसांचे ओळख पटवण्याचे आवाहन
24 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेडिकल हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी विभागाजवळ एका ६० वर्षीय अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सपोनि कैलास आलुरे पुढील तपास करत आहेत.