अलिबाग: आरोग्याबाबत रायगड राज्यात राहणार अग्रेसर
Alibag, Raigad | Apr 17, 2026 रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 'माझं गाव आरोग्यसंपन्न गाव' या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा गुरुवारी वरसोली येथील सभागृहात पार पडली. हे अभियान यशस्वी करुन रायगडचे नाव राज्यात अग्रेसर राहील असे प्रयत्न करूया, असे आवाहन जि.प. अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी केले.