रोहा: खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते रोहा धाटाव येथे महाविद्यालयांच्या नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा
Roha, Raigad | Oct 10, 2025 आज शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास रोहा तालुक्यातील धाटाव येथे एम. बी. मोरे फाउंडेशनच्या सौ. वरदा सुनील तटकरे महिला महाविद्यालय आणि कै. कुसुमताई मनोहर पाशिलकर कनिष्ठ महाविद्यालय या संस्थांच्या नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच दोन वर्गखोल्यांच्या उद्घाटन सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. धाटाव परिसर हा औद्योगिक आणि रासायनिक एमआयडीसी क्षेत्र असल्यामुळे या भागात काम करणे सहज शक्य नसते. या कार्यक्रमास एम. बी. मोरे फाउंडेशनचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी तसेच राष्ट्रवादी परिवाराचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.