समुद्रपूर: लाहोरी शिवारात गावठी मोहा दारू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई:५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
समुद्रपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाहोरी शिवारात पोलिसांनी गावठी मोहा वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करीत ५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार पोलीसांना लाहोरी शिवारातून अवैध गावठी मोहा दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी सापळा रचुन दुचाकी क्रमांक एम एच ३२ डि ३२५५ ची पाहणी केली असता दुचाकीवर १५ लिटर गावठी मोहा दारू आढळून आली यावेळी पोलिसांनी दोघां विरोधात कारवाई केली आहे.