समुद्रपूर: जे.डी चौधरी महाविद्यालयाची खुशी चितलंगे तालुक्यात प्रथम:तालुक्याचा निकाल ८५.६४ टक्के ; एकाच शाळेचा निकाल शतप्रतिशत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी १ वाजता घोषित झाला असून यात समुद्रपूर तालुक्यातून जे.डी. चौधरी महाविद्यालय वासीची खुशी चेतलंगे ८९.१७ टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम आली. तालुक्याचा निकाल ८५.६४ टक्के लागला असून जे.डी चौधरी महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या परिक्षेत १५६१ विद्यार्थ्यानी आवेदन पत्र भरली होती.१५३३ विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट झाले यापैकी १३१३विद्यार्थी उत्तीर्ण झाले.