नागपूर शहर: नागपुरात अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई, एमडी तस्कर ताब्यात : गजानन गुल्हाने पोलीस निरीक्षक
एनडीपीएस पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी 15 जूनला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत बेलतरोडी परिसरात एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई करत ४ संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६५ ग्रॅम एमडी, दोन मोपेड आणि चार मोबाईल असा एकूण ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली आहे.