नागपूर शहर: लकडगंज भागात रेल्वे इंजिनिअरवर हल्ला; दोन आरोपींना अटक : राहुल मदने पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 26 जूनला दुपारी 3:30 ला दिलेल्या माहितीनुसार,लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्ते सफाईच्या कारणावरून झालेल्या वादातून रेल्वे इंजिनिअरवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.