लग्नाच्या पवित्र नात्याचे स्वप्न दाखवून एका युवकाच्या भावनांशी खेळ करत तब्बल २१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फसवणूक झालेल्या २७ वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यातून गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी संदीप शिंदे (रा. वाघोशी, ता. फलटण, सध्या रा. तळोजा, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.