नागपूर शहर: नागपूर हादरले: लकडगंज भागात तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या
नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मालधक्का परिसरात एका तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सोमवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान मालधक्का परिसरात स्थानिक नागरिकांना एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.