आज दिवसभरापासून बदलापूर मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बदलापूर येथील मच्छी मार्केटजवळचा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला असून आज दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सदर भुयारी मार्ग बंद झाल्यामुळे स्टेशनजवळचा पूल एकमेव पर्याय आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचल्यामुळे पालिकेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे.