नागपूर शहर: नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
भारतीय हवामान विभागाकडून नागपूर जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.