अलिबाग: अलिबागमध्ये नालेसफाईला येतोय वेग
Alibag, Raigad | May 23, 2026 अलिबाग नगर परिषदेमार्फत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई आणि गटारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे पावसाळ्यात शहरातील सांडपाणी तुंबून पूरस्थिती उदभवू नये साथींच्या आजारांचा प्रदर्भाव टाळता यावा यासाठी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्यात येते. अलिबाग शहरातील नाले सफाई 70 ते 75 टक्के झाली असून उर्वरित सफाई मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी सांगितले.