नागपूर शहर: धक्कादायक गृहमंत्र्याचा शहरात चालले तरी काय?पुन्हा एका खुनाने हादरले नागपूर! दगडाने ठेचून युवकाचा खून
शहरात गुन्हेगारांचे धाडस वाढले असून, अवघ्या तीन दिवसांत हत्येची दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अंकुश किशोर शेंडे (३२, रा. पंचशील नगर)** या तरुणाची अज्ञात आरोपींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. मृत अंकुश हा मजुरी काम करायचा. 17 मे ला रात्री ८ वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रूप करण्यासाठी त्याच्यावर दगडाने वार करण्यात आले होते.