औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर औंढा नागनाथ शहरा जवळील खंडेश्वरी देवी मंदिराजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना दिनांक 11 डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळी 7:00 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नागेश शिंदे राहणार औंढा नागनाथ बिलाल अहमद, सय्यद इद्रीस दोघे राहणार परभणी असे जखमीचे नावे आहेत जखमींना तात्काळ जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणे सुरू असलेल्या रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले