तालुक्यातील कुणाडा येथील एका महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर घरचे लोक तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी खासगी गाडीने भद्रावती शहराकडे निघाले. मात्र शहराजवळील विंजासन रेल्वे फाटक तब्बल एक तास बंद होते. यावेळी नातलगांनी रेल्वे कर्मचाऱ्याला फाटक खोलण्याची विनंती केली. मात्र कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याने फाटक खोलले नाही. परीणामी महिलेची फाटकाजवळ गाडीतच प्रसुती झाल्याची घटना विंजासन रेल्वे फाटकाजवळ घडली.