समुद्रपूर: नंदोरी येथे मुलाने वडिलाच्या डोक्यावर काठी मारुन केले जखमी:पोलिसात तक्रार दाखल
नंदोरी येथे ६ जुन रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुलाने वडिलाच्या डोक्यावर काठी मारून जखमी केल्याची माहिती आज शुक्रवारी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदोरी येथिल गौतम बुरबुरे यांचा मोठा मुलगा पवन बुरबुरे हा घरी आला व आईला अंडे मागीतले यावेळी गौतम यांनी आपल्या पत्नीला हा कोणत्याही कामधंदा करीत नाही त्याला फुकट अंडे देऊन नको असे म्हटले असता तु अंडे देण्यास मनाई का केली असे म्हणत वडीलाला डोक्यावर काठीने मारुन जखमी केले.