समुद्रपूर: वार्ड क्रमांक १५ मध्ये कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने चोरुन नेले ४७ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी
समुद्रपुर शहरातील वार्ड क्रमांक १५ मधील रहिवासी देविदास झोरे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवून असलेले ४७ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार देविदास झोरे हे आपल्या कुटुंबासह ५ जुन रोजी पळगाव येथे सासुरवाडीला गेले होते.कपाटातील ४७ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याचे निदर्शनास आले यासंबंधी देवीदास झोरे यांनी पोलिस तक्रार दिली.