जालना: छत्रपती संभाजीनगर विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहिर; 23 ऑक्टोबरला होणार मतदान; निवडणूक विभागाची माहिती
Jalna, Jalna | Sep 29, 2026 महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच सदस्यांची मुदत 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार असल्याने या पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने याबाबतचे पत्र संबंधित विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकार्यांना पाठविले आहे. मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाचे यादव यांनी ही माहिती दिली.