नागपूर शहर: कुख्यात फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात : शुभांगी देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 10 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, तुख्यात फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीवर खुनाचा प्रयत्न करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.