सातारा: ऐन दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वडूज-मुंबई एस.टी. बस महामार्गावर पडली बंद; प्रवासी संतप्त
Satara, Satara | Oct 22, 2025 ऐन दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या आनंदावर पाणी फिरले, जेव्हा वडूज-मुंबई ही एस.टी. बस सातारा शहरापासून काही अंतरावर अचानक महामार्गावर बंद पडली. या प्रकारामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी सकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वडूज आगारातून मुंबईकडे निघालेली ही एस.टी. बस पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर बंद पडली.