महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येत आहे.