रामटेक: देवलापार येथे राष्ट्रीय महामार्ग दुभाजकावर आढळली कार ; सुदैवाने कुठलीही मोठी हानी नाही
Ramtek, Nagpur | Mar 24, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ जबलपूरकडून नागपूरकडे येणारी एमपी 50 सी 8072 क्रमांकाची कार मंगळवार दिनांक 24 मार्चला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान महामार्ग दुभाजकावर धडकली. त्यामुळे कार अनियंत्रित झाली. मात्र यात सुदैवाने कुठलीही मोठी हानी झाली नाही.