घनसावंगी: गुटखा माफियाचा मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या ताब्यात; पत्रकार संतोष भुतेकर यांना धमकी देणारे आरोपी सापडणार का?
जालना शहरातील पत्रकार संतोष भुतेकर यांच्यावर झालेल्या हल्ला व धमकी प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुटखा माफियांच्या अवैध कारवायांबाबत सातत्याने बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार संतोष भुतेकर यांना "गुटख्याच्या बातम्या बंद कर, अन्यथा गोळ्या घालू" अशी थेट धमकी देत दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून पळ काढला होता. या प्रकरणात संशयित गुटखा माफिया सतीश लाला जयस्वाल याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तपासाला वेग आला आहे. मात्र पत्रकारांना धमकी देणारे आणि प्रत्यक्ष हल्ला करणारे दोन अज्