वाशिम बसस्थानक परिसरातील आनंद हॉटेलसमोर आज सकाळी सात वाजता एक अज्ञात बॅग दिसून आली. जवळपास तीन तास उलटूनही त्या बॅगेकडे कोणीही दावा केला नाही, यामुळे परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती पाहता संबंधित हॉटेल मालकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅगची तपासणी केली. तपासणीदरम्यान त्या बॅगेमध्ये एका व्यक्तीचे वैयक्तिक सामान असल्याचे आढळून आले. याचदरम्यान, ती बॅग ठेवणारा व्यक्तीही त्या ठिकाणी दिसून आला. त्याची चौकशी करून पुढील प्रक्रिया