नागपूर शहर: 'राज्य सरकार म्हणजे भ्रष्ट व्यवस्था, शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे': नाना पटोलेंचा घणाघाती आरोप
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. हे सरकार केवळ 'खोटारडे सरकार' असून, शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक करत असल्याचा दावा पटोलेंनी केला आहे. 'लाडकी बहीण' योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांच्या बाबतीतही मोठी फसवणूक केली जात असल्याचे ते म्हणाले.