नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका सुरू असून अनेक पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. बदलापूर मध्ये काँग्रेसला देखील मोठे खिंडार पडले आहे. बदलापूर मधील काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.