जालना: *हप्ता थकला म्हणून रात्री घरी जाऊन शिवीगाळ; जालन्यात HDB फायनान्सच्या मॅनेजरवर कारवाईसाठी मनसे आक्रमक*
Jalna, Jalna | Sep 6, 2026 जालना शहरातील मस्टगड भागातील, रेल्वे स्टेशन रोडवरील निरामय हॉस्पिटलसमोर असलेल्या HDB फायनान्शियल सर्व्हिसेस (HDB Financial Services) शाखेतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या शाखेचे मॅनेजर विशाल वानखेडे यांच्या मनमानी, मुजोर आणि अरेरावीच्या कारभाराविरोधात आता ग्राहक आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. कर्जाचा हप्ता भरण्यास काही वेळ किंवा दिवस मागे-पुढे झाल्यास, मॅनेजर विशाल वानखेडे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) रिकव्हरी नियमांचे उघडपणे उल