औंढा नागनाथ: तहसील कार्यालयावर बाजार समिती मैदान येथून सकल आदिवासी समाजाचा उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चा
अनुसूचित जमाती आरक्षणात इतर जातीचा समावेश करू नये, छोट्या संवर्गातील बिंदू नामावली पूर्ववत ठेवावी,यासह विविध मागण्यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने दिनांक सात ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी एक वाजता औंढा नागनाथ तहसील कार्यालयावर उलगुलान आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, गणाजी बेले, डॉक्टर सतीश पाचपुते सह समाज बांधवांची उपस्थिती होती यावेळी मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले