घनसावंगी: रुई प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल,दोघांना अटक
प्रेमसंबंधांच्या कारणावरून 18 वर्षाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील रुई येथे ही घटना घडलीय. राजेश कोरकाने असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.या प्रकरणी तिर्थपुरी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. राजेश कोरकाने हा फोटोग्राफीचे काम करत होता. गावातील एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी शुभम साळे, करण साळे यांच्याशी त्याचा वाद झाला होता. त्यावेळी दत्ता साळे यांनी त्याला “एक-दोन दिवसांत तुला पा