समुद्रपूर: वायगाव हळद्या येथील पि.व्ही टेक्स्टाईलयच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
समुद्रपूर:- तालुक्यातिल वायगाव ( ह) येथिल रहिवाशी लक्ष्मन मंगलुजी गुजरकर यांनी आपल्या राहत्या घरी घराच्या अँगलवर दोर बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्यावर महिंद्रा फाईनान्स कंम्पनिचे दिड लाख रुपयांचे कर्ज होते.महिंद्रा फायनन्स च्या कर्मचाऱ्यांचा कर्ज परत करण्यासाठी खूप तगादा असल्याने तो विचलित झाला होता काही व्यवस्था होत नसल्याने लक्ष्मण ने गळफास घेऊन आत्महत्या केली असे कुटटुबियांकडून सांगण्यात आले आहे.