नागपूर शहर: वाहनचोरीचा गुन्हा उघड: गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद
28 जून ला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-३ ने तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी गुंजन उर्फ चिंटू विश्वजीत खोमणे (वय २८, रा. गांजाखेत) या आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची एक्टिवा जप्त केली आहे.गुन्हा क्रमांक ३२७/२६ अन्वये गुन्हा दाखल असून, पुढील कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.