हवेली: आकुर्डी येथील जयश्री एक्सेलन्सी अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची घटना घडली
Haveli, Pune | Oct 8, 2025 अपार्टमेंटच्या इलेक्ट्रिक पॅनल मीटर बॉक्समध्ये अचानक आग लागल्याची माहिती मुख्य अग्निशमन केंद्राला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी होज रील होजच्या साहाय्याने पाणी मारून आग पूर्णतः विझवली.या आगीत १३ मीटर बॉक्स, इलेक्ट्रिक पॅनल आणि वायर्स जळून खाक झाले होते. धूर चौथ्या मजल्यापर्यंत पसरला होता; जवानांनी सर्व मजल्यांवरील फ्लॅट्सची पाहणी करून खिडक्या-दरवाजे उघडे करून धूर बाहेर जाण्याची व्यवस्था केली. सर्व रहिवासी सुखरूप आहेत.