सेनगाव: वलाना येथील कुमारी ज्ञानवी संजय वाकोडे हिचा जिल्हास्तरीय नन्हे सितारे उपक्रमात प्रथम क्रमांक
सेनगांव तालुक्यातील वलाना येथील इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी ज्ञानवी संजय वाकोडे हिचा विनोबा अॅप द्वारे घेण्यात आलेल्या नन्हे सितारे या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने वलाना येथे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. ज्ञानवीने चमकदार कामगिरी करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुनील वाकोडे,शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर नेहूल तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.