लातूर: विवेकानंद चौक परिसरात ८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त; एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
Latur, Latur | Nov 2, 2025 लातूर -स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूरच्या विवेकानंद चौक परिसरात अवैध धंद्यावर धाड घालत ८ लाख ३३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी कारचा समावेश आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू आहे.