ठाणे: तलाव पाळी येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात तरुणाईचा जल्लोष
Thane, Thane | Oct 20, 2025 ठाण्यातील तलाव पाळी येथे गेल्या पंधरा वर्षापासून दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील माझी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी सहा वाजल्यापासून ठाण्यातील तरुणांनी दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के यांनी देखील उपस्थिती लावून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.