रामटेक: पवनी वनपरिक्षेत्रातील उसरीपार शेत शिवारातून एखाद्या कुत्र्यासारखे पीटाळून लावले एका वाघाला
Ramtek, Nagpur | Mar 24, 2026 रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात वाघाने प्रचंड दहशत घातली आहे. वाघांनी पशुसह मानवाचे ही बळी घेण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच टूयापार येथील पशुपालक मनोज सांगोडे यांच्या पशुच्या गोठ्यात एका बिबट्याला रेस्क्यू करून पकडले. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर मंगळवार दि. 24 मार्चला सकाळी वनविभागाच्या पवनी एकसंघ नियंत्रण कक्षा अंतर्गत असलेल्या उसरीपार येथे एका शेतातून शेतात शिरलेल्या एका वाघाला माकड, कुत्र्यासारखे आरडाओरड करून पिटाळून लावले.