"अवयव दान श्रेष्ठ दान"- तुमचा एक निर्णय आठ जणांचा जीव वाचवू शकतो.
1.7k views | Washim, Maharashtra | Aug 2, 2025 वाशिम (दि.०२,ऑगस्ट): ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत "अवयवदान पंधरवडा" साजरा होणार असून या पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अथवा https://notto.abdm.gov.in/register या लिंकवर जाऊन आपली अवयवदान नोंदणी निश्चित करावी. तसेच अवयदान करण्याची प्रतिज्ञा घ्यावी असे आवाहन वाशिम जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.