आज २५ नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी साडे चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती महानगरपालिका शिक्षण विभाग तसेच महिला व बालकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ व २७ नोव्हेंबर २०२५ रोजी “बाल आनंद महोत्सव २०२५” चे भव्य आयोजन सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा दोन दिवसीय उत्सव आनंद, कौशल्यविकास आणि सृजनशीलतेचा सोहळा ठरणार आहे.महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे....