जालना: ब्राह्मण समाजाच्या वतीने महापौर वंदना मगरे यांचा सत्कार
Jalna, Jalna | Sep 6, 2026 जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रथमच विराजमान झाल्याबद्दल महापौर वंदना मगरे यांचा ब्राह्मण समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाच्या विविध मागण्यांबाबत महापौरांकडे निवेदन देण्यात आले. जालना शहरातील महानगरपालिका हद्दीत भगवान परशुराम चौक तसेच भगवान परशुराम सभागृहासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली. भगवान परशुराम यांच्या नावाने चौक व सभागृह उभारल्यास समाजाच्या विविध उपक्रमांसाठी तसेच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्याचा