वसई: वसई पश्चिम बाभोळा नाका,तनिष्क ज्वेलर्समध्ये चोरी प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
Vasai, Palghar | Apr 19, 2024 ज्वेलर्स दुकानात काम करणाऱ्या एका नोकर तरुणीने ग्राहकाच्या मदतीने मिळून दागिने चोरल्याची घटना वसईच्या बाभोळा नाका येथील तनिष्क ज्वेलर्समध्ये ११ एप्रिलला सकाळी घडली आहे.घटनेच्या दिवशी ज्वेलर्स दुकानात आरोपी तरुणी अमृता सकपाळ (२७) ही काम करत होती. यावेळी ज्वेलर्स दुकानात अनिकेत मारचंडे हा आला. अमृताने अनिकेतसोबत संगनमत करून त्याला सोन्याची चेन दाखविली. १ लाख ७५ हजारांची सोन्याची चेन अनिकेतने गळ्यात घालून तो दुकानातून निघून गेला.