नागपूर शहर: नागपूरच्या सोमलवाड्यात हॉटेल कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; ५ जणांनी केली बेदम मारहाण, बघा थरारक फुटेज
नागपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचे धक्कादायक रूप समोर आले आहे. नागपूरच्या सोमलवाडा भागात रात्रीच्या वेळी एका हॉटेल कर्मचाऱ्यावर पाच तरुणांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.