नागपूर शहर: ऑटोतून फेकून दिले तरुणाला,तिघांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
8 जुलैला दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत एका अनोळखी व्यक्तीला मारहाण करून ऑटोतून फेकून देणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट-३ ने जेरबंद केले आहे.२८ जून रोजी पहाटेच्या सुमारास जखमी अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी इसमाला मेयो रुग्णालयात दाखल केले होते, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांत मर्ग दाखल होता.गुन्हे शाखेने समांतर तपास करत १०० हून अधिक ठिकाणीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून मयताची ओळख हेमलाल राजेंद्र ध्रुतलहरे अशी प